मुंबईः एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नसून मुख्यमंत्री मात्र मिरवणूका घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत, असा टोला आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. तसेच महाराष्ट्रातील सुरू असलेल्या राजकारणा संदर्भात आम आदमी पार्टीच्या मुंबई आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी फोर्ट येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोन मंत्री मिळून सुरू असलेल्या राज्यसरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, बंडखोरी होऊन शिंदे यांचा मुख्यमंत्री आणि फडणवीस यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होऊन एक महिना झाला आहे.



