मुंबई : पीडीपी आणि भाजपमधले संबंध आता ताणले जात आहेत. कारण दिवसेंदिवस मेहबूबा मुफ्ती कठोर शब्दात टीका करत आहेत. आताही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप लावलेत. “काश्मीरमध्ये लोकशाही संपवली जातेय”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत. शिवाय भाजप सध्या काश्मीरला प्रयोगशाळा बनवू पाहतंय. मात्र तसं करता कामा नये, असं मुफ्ती म्हणाल्या आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राहणारे काश्मिरी लोक विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. राज्यात तैनात असलेल्या सशस्त्र दलातील जवानांपासून ते अधिका-यांपर्यंत प्रत्येकजण मतदार यादीत नाव समाविष्ट करून मतदान करू शकणार आहे, असं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. त्याचा संदर्भ घेत मुफ्ती यांनी हे विधान केलंय. आयोगाच्या या निर्णयावर मेहबूबा मुफ्ती यांनी निषेध नोंदवला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.




