जयपूर, दि. २१ – राजस्थानमधील भाजपचे नेते आणि माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांच्या खळबळजनक वक्तव्याचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये ते त्यांच्या समर्थकांनी आतापर्यंत पाच जणांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली देताना दिसतात.
गायींची तस्करी आणि कत्तल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मी माझ्या समर्थकांना हत्येची पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यांना मी जामीन मिळवून देईन. त्यांची सुटकाही करेन, असे आहुजा संबंधित व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात. तो व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी ट्विटरवरून शेअर केला. व्हिडिओमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
देशाच्या विविध भागांत जमावाकडून हत्या होण्याच्या अनेक घटना घडतात. त्यावरून मोठा वादंग होतो. अशात आहुजा यांच्या वक्तव्याने भाजपवर टीकेची झोड उठवण्याची संधी विरोधकांना दिली मिळणार आहे. दरम्यान, राजस्थान भाजपने आहुजा यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. आहुजा यांचे वक्तव्य व्यक्तिगत असल्याचे पक्षाने म्हटले




