बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन तालूका माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीवर्धन संस्थेची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२१ आॕगस्ट रोजी श्रीवर्धन येथील कै.ग.स.कातकर कुणबी समाज सभागृहात पार पडली. पतसंस्थेच्या वतीने तालुक्यातील स्कॉलरशिप, दहावी,बारावी आणि पदवीच्या परीक्षेत विशेष गुण मिळवून १ ते ३ क्रमाकांने उत्तिर्ण झालेल्या सभासदांच्या व इतर गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर पतसंस्थेचे सदस्य यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक त्याचबरोबर संस्थेचे सेवानिवृत्त सभासद यांचाही संस्थेच्या वतीने यथोचीत सन्मान करण्यात आला.
पतसंस्था प्रगतीच्या अग्रस्थानी नेण्यासाठी सभासद,संचालक, ठेवीदार,संस्था कर्मचारी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक श्रीवर्धन व बोर्लीपंचतन शाखाधिकारी सर्व कर्मचारीवृंद तसेच लेखा परिक्षकांचे वारंवार मिळणारे सहकार्य याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रितम वाडकर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले व यापुढेही असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली.सभेचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक श्याम वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक शिवप्रसाद वारुळे यांनी केले.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरेश नाथजोगी,सचिव आशिष झगडे संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते.


