उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका सहावर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करुन मुलीच्या गुप्तागावर नराधम आरोपीने वार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे.
पीडीत मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत, रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. राज्यात मागील अनेक दिवसांपासून मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
भंडाऱ्यातील प्रकरणामध्ये संपुर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता असाच प्रकारची धक्कादायक आणि क्रुर घटना आता तुळजापूमध्ये घडली आहे. वासनांध नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गावकऱ्यांनी आरोपी संतोष वडणे (वय 35 ) राहणार माळुब्रा ता. तुळजापूर या पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी वडणे हा पहिल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर याआधी देखील अनेक गुन्ह्ये नोंद असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.
सदरील घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी पीडितेच्या कुटुंबास तात्काळ भेट देऊन प्रशासनास आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेण्याची सुचना केल्या आहेत.



