मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर असून त्यांना तब्बल २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि बीएमसी कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यामध्ये बुधवारी बोनसबाबत बैठक झाली, यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय झाला.
या बैठकीत युनियनने कामगारांचे विविध मुद्दे मांडले. यावेळी कर्मचाऱ्यांना २० ते २५ हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी यावेळी युनियनकडून करण्यात आली होती. पण या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊन चर्चा करण्यात येईल, असं आश्वासन आयुक्तांनी युनियनला दिलं होतं.



