मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेला वाद न्यायालयात आणि नंतर निवडणूक आयोगाच्या दारी पोहचला. दरम्यान शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरास मनाई केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तर शिंदे गटाला नाव दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाला चिन्ह म्हणून ‘धगधगती मशाल’ मिळाली आहे. दरम्यान या चिन्हासोबत शिवसेनेचं नातं मात्र खूप जूनं आहे.
शिवसेना आणि मशालीचा इतिहास….
शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होतं, छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं होते. तसेच 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते.
74 नगरसेवक आले होते निवडूनयासोबतच 1985 साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले त्यावेळी देखील त्यांना मशाल हेच चिन्ह मिळाले होते. या चिन्हावर निवडणूक लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांना मोठं यश मिळालं होतं. मशाल या चिन्हावरच शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली होती. दरम्यान अंधेरी पूर्व मतदारसंघातील आगामी निवडणूकीत उध्दव ठाकरेंसाठी मशाल हे चिन्ह कितपत यश मिळवून देईल याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

शिवसेना आणि मशालीचा इतिहास
शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होते छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी पण चिन्ह मिळाले होते मशाल या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली होती.



