पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात आला. त्याची चर्चा पुल पाडण्याची चर्चा राज्यभर झाली. त्यानंतर ही चांदणी चौकातील वाहतूक कोंडी पूर्वी प्रमाणेच सुरू आहे. आज रविवार सुट्टी असल्याने वाहतूक प्रंचड प्रमाणात आहे. त्यामुळे “पुल टीचभर आणि चर्चा महाराष्ट्रभर” अशा चर्चा सध्या नागरिकांमधून सुरू झाली आहे.

मुंबई -बंगलोर महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौकातील पुल २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री कंट्रोल ब्लास्टद्वारे पाडण्यात आला. पुल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्याचे काम आजही जोरात सुरु आहे. पुल अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत असल्याने पुल पाडण्यास उशीर होत आहे. त्यामुळे अजूनही राडारोडा उचलण्याचे काम सुरु असून आणखी वेळ लागेल हे सांगता येणार नाही.

पूल पाडण्यासाठी पुलामध्ये १३५० छिद्र करून ६०० किलो स्फोटक वापरण्यात आले होते. हा पूल ६ सेकंदात जमीनदोस्त होईल असे सांगण्यात आले होते. मात्र १ वाजता स्फोट झाला. अगदी काही सेकंदात पुलाचा मध्यभाग खाली आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग अगदी आहे त्या स्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संपूर्ण पूल सहा सेकंदात जमीनदोस्त केला जाणार असे संबधित कंपनी आणि प्रशासनामार्फत सांगितले होते. मात्र पूल पडलाच नाही. त्यानंतर पोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पडण्यात आला आहे. अखेर अडीच वाजता हा पूल जमीनदोस्त करण्यात आला आहे.


