पुणे : दिवाळीला आकाशकंदीलला खूप महत्व असत. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे अनेक लोक स्वतः आकाशकंदील बनवणं पसंत करतात. अनेकांना आवड असते म्हणून घरीच आकाशकंदील बनवले जाते. तुम्ही घरच्या घरी सोपा ,सुंदर आणि आकर्षक कंदील बनवू शकता. यावर्षी दीपावलीचा सण अधिक खास बनणार आहे, कारण आपल्या घरावर आपल्या मुलांने बनविलेलाच आकाशकंदील सजणार आहे. यासाठी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुढाकार घेतला आहे.
दिवाळीनिमित्त ‘मोफत आकाशकंदील कार्यशाळा’ आयोजित केली आहे. यात सहभागी होण्यासाठी 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधून या मोफत कार्यशाळेचा लाभ घेऊ शकता. आकाशकंदील बनविण्याचे साहित्य आपणास कार्यशाळेच्या ठिकाणीच मोफत उपलब्ध करून दिले जाईल. तरी आकाशकंदील कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले आहे.
दिनांक: १८ ऑक्टोबर २०२२, मंगळवार
वेळ: सायं. ४ ते ६
ठिकाण: संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, पाषाण




