हैदराबाद : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी सकाळी रायचूरहून कर्नाटकातून बाहेर पडल्यानंतर तेलंगणातील गुडेबेलूरमध्ये दाखल होईल. कर्नाटक- तेलंगणा सीमेवर एंट्री पॉइंटवर राहुल यांच्या या यात्रेचे स्वागत करण्यासाठी तेलंगणा काँग्रेसने विस्तृत व्यवस्था केली आहे.
https://www.instagram.com/reel/Cj0B-4vDNUi/?igshid=YmMyMTA2M2Y=
यात्रा २३ ऑक्टोबर दुपारपासून २६ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस दिवाळीसाठी थांबवली जाणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबरला सकाळी गुडेबेलूर येथून यात्रा पुन्हा सुरू होईल. ती मक्काल येथे पोहोचेल. तेलंगणात ही यात्रा १६ दिवस चालणार आहे. १९ विधानसभा आणि ७ संसदीय मतदारसंघ कव्हर करून ३७५ किमी अंतरापर्यंत तेलंगणामध्ये ही यात्रा चालणार आहे. ती ७ नोव्हेंबरला येथून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.



