नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील बदायूंमधील झरीफनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गावात एका तरुणाने काचेच्या ग्लासमध्ये ठेऊन फटाका फोडला. यामुळे भीषण स्फोट झाला असून त्यात एकाला आपला जीव गमवावा लागला.
काचेचा तुकडा एका वाटसरूच्या मानेला लागला आणि तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बदायूं जिल्ह्यातील जरीफनगर पोलीस ठाण्याच्या मोरुबाला गावातील आहे. सूत्रांनी सांगितले की, सोमवारी येथील दीपावलीच्या रात्री गावातील धीरेंद्रने काचेच्या ग्लासात ठेवून फटाके फोडले. फटाका फुटल्याने काचेचेही तुकडे झाल्याचे त्यांनी सांगितले.




