नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी झाल्यानंतर भारतीय सराफात या दोन धातूच्या दरात घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर १९६ रुपयांनी कमी होऊन ५०,७०२ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर ७२४ रुपयांनी कमी होऊन ५७,५०१ रुपये प्रति किलो झाला. डॉलर वधारत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा दर १, ६४३ डॉलर व चांदीचा दर १८.९६ डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोने व चांदीच्या दारात घट झाली.
ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात घट होत असल्यामुळे भारतीय ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी निर्माण झाली असल्याचे समजले जात आहे. नुकत्याच संपलेल्या धनतेरस मध्ये भारतात गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याची खरेदी बरीच वाढली असल्याची माहिती भारतातील दागिने उत्पादकांनी दिली.




