पुणे : शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज दुपारी त्यांचं निधन झाले. आज रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निम्हण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पुण्याच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- दोनदा शिवसेना एकदा काँग्रेस आमदार
माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.




