उमेदवारासाठी रोखीच्या व्यवहाराची मर्यादा दोन हजार ?
नवी दिल्ली : विविध राज्यातील देशातील निवडणुकीतील खर्चाचे व्यवहार अधिक पारदर्शी व्हावेत यासाठी उमेदवाराला रोखीने व्यवहार करणाऱ्यावर मर्यादा घालण्याचा एक नवा प्रस्ताव निवडणूक आयोगाने सरकारला पाठवला आहे. सध्या १० हजारांपर्यंतचे व्यवहार रोखीने करण्याची उमेदवारांना अनुमती आहे, ती मर्यादा २ हजारांवर आणण्याचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव आहे.
सरकारला सादर केलेल्या प्रस्तावात, निवडणूक समितीने ही शिफारस केली आहे त्यानुसार निवडणूक आचारसंहितेत सुधारणा करण्याची सूचना आयोगाने सरकारला केली आहे.
१० हजारांपेक्षा अधिकची देयके उमेदवाराने चेक किंवा आरटीजीएस किंवा अन्य हस्तांतरण सुविधांमार्फतच द्यावीत, अशीही आयोगाची सूचना आहे. निवडणूक काळात मतदारांना दारू किंवा पैशाची लाच देण्याचा प्रकार होऊ नये, यासाठीही आयोगाने अन्यही काही सूचना संबंधित विभागांना केल्या आहेत.




