मुंबई ; राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांनी अटक केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत राज्यातील शिंदे फडणवीस सरकार विरोधात आवाज उठवला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. @Awhadspeaks @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 11, 2022
तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती करण्यात आला. तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या @Awhadspeaks साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 11, 2022


