पुणे : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने व मापांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन केलेल्या एकूण ८८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
वैध मापन शास्त्र अधिनियम २००९ तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमजबजावणी) नियम, २०११ व वैधमापन शास्त्र ( आवेष्टित वस्तु) नियम, २०११ मधील नियमांचा भंग केल्यामुळे या आस्थापनांवर कारवाई करुन खटले दाखल करण्यात आले.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच ९८६९६९१६६६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा वैध मापन शास्त्र उप नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.




