शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत आणि शिंदे गटात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. शिंदे गटाच्या बंडखोर १२ खासदारांनी संजय राऊतांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला असता त्यांनी या १२ खासदारांवर हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “अच्छा, मी इतका मोठा आहे का? म्हणून त्यांनी मला तुरुंगात डांबलं होतं का? आत्ता मला रहस्य कळलं की, त्यांना मला उत्तर देता येत नव्हतं म्हणून त्यांनी मला १०० दिवस तुरुंगात डांबलं. हे १२ खासदारांनी सांगितलं ते बरं केलं



