पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शनिवारी (ता. २० नोव्हेंबर) वाद्ग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला असून राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. ‘राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस’ असे मजकूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे फ्लेक्स पुणे शहरात लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान प्लेक्समध्ये खाली एक टीप लिहिण्यात आलेली आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास रोख एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येईल, असेही काळे यांनी म्हटले आहे.




