पुणे, दि. 23 – प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी विक्रम गोखले यांना त्रास होऊ लागल्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजता उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांना लिव्हरचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे.
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे
विक्रम गोखले हे पुण्यातील रुग्णालयात दाखल आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती CINTA चे ज्येष्ठ अध्यक्ष मनोज जोशी यांनी दिली आहे. Aajtak.in शी बोलताना ते म्हणाले- त्यांची (विक्रम गोखले) प्रकृती गंभीर असून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवीन माहितीनुसार विक्रम गोखले यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. डॉक्टरांनी सपोर्ट सिस्टीमही काढून टाकली आहे.




