पुणे, दि. 23 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 या अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात विशाल चौधरी हा राज्यात पहिला आला तर मुलीमध्ये पूजा गवळी पहिली आली आहे. यानंतर यशस्वी उमेदवार आणि त्यांच्या मित्रांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. तर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला.
एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब च्या राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि पोलिस उपनिरिक्षक या संवर्गासाठी एकत्रित 26 फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व परीक्षा घेतली होती. यात राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 107 पदांसाठी सुमारे 1 हजार 800 हून अधिक उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते. मुख्य परीक्षा जून आणि जुलैमध्ये झाल्या.
- राज्यकर निरीक्षक परीक्षेत अक्षय पडूळ, नम्रता मस्के अव्वल
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2021 राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात औरंगाबादचा अक्षय पडूळ, तर मुलींमध्ये नम्रता मस्के अव्वल ठरले. एमपीएससीने 26 फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्व परीक्षा घेतली होती. यात राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या 609 पदांसाठी सुमारे 10 हजारांहून अधिक उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र झाले होते. यातील 609 पदांसाठी गुनवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी बुधवारी आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.




