पुणे : महापुरुषांपेक्षा माजी प्रदेशाध्यक्ष व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अपमान भाजपला महत्वाचा वाटतो. शाई फेकल्यानंतर भाजपचे नेत्यांना अतिशय दुःख झालेले दिसते. भाजप-शिंदें गटाकडून सातत्याने महापुरुषांचा अपमानस्पद वक्तव्य केल जात आहे. यात चंद्रकांत पाटीलांनी महापुरुषांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याबरोबर भाजपचे नेते प्रतिक्रिया देण्यास उत्सुक झाले आहेत. भाजपचे मंत्री महापुरुषांचा अपमान करतात तेव्हा कोणी तातडीने भाजपचे नेते प्रतिक्रिया द्यायला आले नाही. पण चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्यानंतर भाजपचे नेत्यांना अतिशय दुःख झालेले दिसते. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केली आहे.
राज्यपालाकडून तसेच भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी महाराजांचा, शाहू, फुले, आंबेडकरांच्या अपमानापेक्षा भाजपला त्यांच्या मंत्र्यांचा झालेला अपमान मोठा वाटतो हेच यातून दिसून येते असे वरपे यांनी म्हटले आहे.




