कराड [पारस पवार] ; विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. विषय दिवस समारोह समितीच्या कार्यक्रमात ब्रिगेडीयर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असून 15 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
15 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात पुरस्काराचे वितरण आणि ब्रिगेडीयर जेम्स थॉमस व पोलिस अधिक्षक समीर शेख यांचा विषेश पुरस्काराने सन्मान होईल. याच कार्यक्रमात वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कऱ्हाड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कऱ्हाड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड) यांनाही गौरवण्यात येईल.
आतापर्यंत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, संभाजीबाबा थोरात, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, नागनाथअण्णा नायकवडी, आचार्य शांताराम गरुड, भाई संपतराव पवार, अशोक गोडसे, क्रिकेटर चंदू बोर्डे, उद्योजक बाबासाहेब कल्याणी, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजरीव कदम, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, कृषितज्ज्ञ सदुभाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहेत. आदर्श माता बाळुताई ढेबे (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (कराड) यांनाही गौरवण्यात येईल.
या कार्यक्रमास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे उपस्थित राहणार आहेत.



