पुणे: रिक्षा – संघटनांच्या आंदोलनातील नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन सुरू ठेवायचे, की सेवा सुरू करायची ? यामध्ये रिक्षा चालकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले. मात्र, रिक्षा पंचायतीकडून सेवा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिक्षा चालकांवर पोलिसांकडून चुकीची कारवाई झाल्यास रिक्षा पंचायक त्यांच्यामागे उभी राहील, असे पंचायतीने स्पष्ट केले आहे.
ज्या प्रश्नांसाठी हे आंदोलन सुरू झाले होते. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी न्यायालयासह इतर मार्गाने दाद मागितली जाईल. आंदोलन व पुणे बंद मुळे दोन दिवस रिक्षा बंद राहिल्या आहेत. रिक्षा चालकाचे हातावर पोट आहे. तसेच, दोन दिवसाच्या रिक्षा बंदमुळे रिक्षाची प्रवासी सेवा घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले विद्यार्थी अशा घटकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर पासून रिक्षा सेवा पूर्ववत सुरू करावी, असे आवाहन नितीन पवार यांनी केले आहे. तर, संबंधित कंपन्यांचे ॲप बंद होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा काही संघटनांनी घेतला आहे.




