मुंबई – मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या वर्षी देखील याच इमारतीला अशाच प्रकारची आग लागली होती. आग लागताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
https://twitter.com/ssidsawant/status/1603264584789659648?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1603264584789659648%7Ctwgr%5Ec4aa5bdb08b020176a0e9a1a933754e7fe8f5f64%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Ffire-in-mumbai-a-sudden-fire-broke-out-on-the-35th-floor-of-van-avighna-building%2F
अचानक ३५ व्या मजल्यावर लागलेल्या या आगींचे डोंब लांबूनही स्पष्टपने दिसून येत होते. गेल्या वेळेस या इमारतीत लागलेल्या आगीमुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे आता परिसरात आगीची बातमी समोर येताच भीतीचे वातारण निर्माण झाले. आज सकाळी साधारणतः पावणे अकराच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.



