कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले. ते भिक मागत नव्हते. महापुरुषांनी दिलेले योगदान असुनही त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणे चुकीचे आहे. वक्तव्याबद्दलचे तारतम्य आजकालच्या राज्यकर्त्यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचा नामाोल्लेख टाळून केली.
खासदार पवार आज कऱ्हाड (जि.सातारा) दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. . महापुराषाबद्दल नेते, मंत्री यांच्याकडुन केलेल्या जात असलेल्या वक्तव्याबाबत खासदार पवार म्हणाले, महापुरुषाबाबत कोणी काय चुकीचं बोललं तर लोकांना संताप येणारच. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वतःची संस्था चालवताना तेथील मुलांना दोन वेळचे अन्न नसल्याने स्वतःच्या पत्नीचे दागिने विकले आणि मुलांना शिकवले ते भिक मागत नव्हते.



