नवी दिल्ली : बेरोजगारीमुळं महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून (NCRB) ही बाब समोर आली आहे. लाजीरवाणी बाब म्हणजे मागील दोन वर्षात देखील आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राच सर्वोच्चस्थानी होता.
NCRBच्या अहवालात काय म्हटलंय?
गृहखात्याच्या अतंर्गत येणाऱ्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा २०१९ ते २०२१ चा देशातील आत्महत्या झालेल्या राज्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र टॉपवर असून सन २०२१ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 22207 आत्महत्या झाल्या आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत 18,925 आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर 14,965 मध्य प्रदेशचा आहे. यामध्ये लाजीरवाणी बाब म्हणजे २०२० मध्ये देखील महाराष्ट्राच आत्महत्यांमध्ये आघाडीवर होता. त्यावेळी राज्यात १९९०९ आत्महत्यांच्या नोंदणीकृत घटना होत्या. तसेच सन २०१९ मध्ये १८,९१६ आत्महत्यांसह महाराष्ट्राच सर्वोच्च स्थानी होता.




