
महाराष्ट्राला शूरवीरांची मोठी परंपरा लाभली आहे. शौर्याच्या बाबतीत मराठी महिला देखील कधी मागे राहिलेल्या नाहीत. स्वराज्यजननी जिजामातांच्या पासून ते थेट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पर्यंत अनेक महिलांनी राज्यशकट चालवलाच शिवाय युद्धकाळात डावपेच बनवण्यात देखील त्यांनी आपली हातोटी दाखवली. हीच परंपरा आजच्या मराठी माताभगिनी चालवत आहेत.
याच परंपरेमध्ये शिरपेच खोवला तो भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर होत्याच मात्र राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांबरोबरच त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सरसेनापती बनल्या.




