मुंबई : शिवसेनेचे बाहेर ब्राह्मण नेते खासदार संजय राऊत यांनी आज नागपुरात बरेच बॉम्ब फोडणार असे सूचक वक्तव्य करत राज्यातील शिंदे सरकारला इशारा दिला आहे. ते खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत शिवसेना शाखांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना म्हणाले.
नागपूर येथे सोमवारी आम्ही बरेच बाॅम्ब फोडणार आहोत’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून त्या ठिकाणी मोठ-मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. यातच संजय राऊत यांनीही सरकारला इशारा दिला आहे.
‘अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून तुमची झोप उडवणार, तुमचे शंभर पापे भरली आहेत. तुम्हाला सोडणार नाही’, असेही राऊत म्हणाले. मी ज्या कोठडीत होतो, आता त्यात तुम्हाला टाकणार, तुमच्या सर्व फायली तयार आहेत, असा इशाराही राऊत यांनी दिला.



