मा. जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थीर आहे अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री शंभूराज देसाई यांनी दिली.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. फलटण जवळील पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बानगंगा नदीच्या पुलावरुन 30 फूट खोल नदीत कोसळली. त्यावेळी गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. त्यातील गाडीमधील 2 जण गंभीर तर इतर 2 दोघे किरकोळ जखमी आहेत.
मा. जयकुमार गोरे हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन संपूर्ण क्षमतेने कार्यरत होतील, मा. जयकुमार गोरे यांची प्रकृती आता स्थीर आहे. त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी करू नये, असे सर्वांना आवाहन पालकमंत्री यांनी केले. याप्रसंगी खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मा. धैर्यशील कदम यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत तसेच आमदार मा. जयकुमार गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




