राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी सन २०२२-२३ अंतर्गत लेखाशिर्ष ३०५४ २०५२ व ५०५४-४२७३ या योजनेंतर्गत १ कोटी १५.०० लाखांची कामे मंजूर झाली
आहेत.
यामध्ये २ ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरण या योजनेमधून दुर्गळवाडी ते बोरबन रस्ता सुधारणा करणे २० लाख, कालगांव- हेळगांव- गोसाव्याचीवाडी – पाडळी रस्ता ग्रा.मा. सुधारणा करणे (भाग- हेळगांव ते चिंचणी) २० लाख, तसेच जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण या योजनेमधून निसराळे ते अतित – पाल रस्ता सुधारणा करणे २० लाख, जायगांव – कण्हेरखेड – वेलंग निगडी दुधी कटापूर रस्ता सुधारणा करणे २५ लाख, जायगांव- कण्हेरखेड – वेलंग – निगडी- दुधी- कटापूर रस्ता २० लाख, औंध – गणेशवाडी- कळंबी ते राजाचे कुर्ले रस्ता सुधारणा करणे १० लाख.



