पुणे : पुणे बेंगलोर महामार्गावर वारजे जवळ भीषण अपघात अपघातात दुचाकीवरून चालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू संकल्प चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
प्राथमिक माहितीनुसार, संकल्प चव्हाण हा वारजेहून धायरीच्या दिशेने दुचाकीवर जात असताना ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की चव्हाण थेट ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला
वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे



