पुणे : लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून फुरसुंगी, उरळी देवाची नगरपालिका जाहीर करून टाकली. महापालिकेतील समावेशाने कोणाची तरी गोडाऊनचा टॅक्स वाढतो किंवा कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून राज्यकर्ते असा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.
त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पुढील वीस पंचवीस वर्षे डोळ्यासमोर ठेवून तो घ्या. आऊट घटकेचा निर्णय घेऊ नका, असा सल्ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.हडपसर येथील अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ४० किलो वँट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन प्लँटचे उद्घाटन विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, “येत्या काळात विजेचे दर मोठ्याप्रमाणात वाढलेले असतील. त्यामुळे अपारंपरिक उर्जेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. अमरसृष्टी सोसायटीने हा प्रकल्प राबवून चांगला आदर्श दिला आहे. रहिवाशांनीही आपापल्या बंगल्यावर असे संच बसवून विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. कचरा, सांडपाणी व्यवस्थापन याहारख्या प्रकल्पांवरही सगळ्याच सोसायट्यांनी लक्ष दिले पाहिजे.अंतर्गत भांडणे झाली की सोसायटी मध्ये प्रगती थांबते. मी देखील एका सोसायटी चा अध्यक्ष आहे. सगळ्या गमती जमती मला माहिती आहेत.’ सोसायटीने पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्या बद्दल त्यांनी अभिनंदनही केले.चेअरमन स्वप्नील धर्मे म्हणाले, “सोसायटीअंतर्गत रस्त्यावरील दिवे, पंप, स्विमिंग पूलचे पंप आदी ठिकाणी विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. दरमहा एक लाख वीस हजार रुपये इतके बिल येत होते.




