मुंबई : राजकीय पटलावर एकमेकांवर आसूड ओढणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात याची पुन्हा प्रचिती आली आहे. पंकजा मुंडे आज भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कॅण्डीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झाले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार , माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पंकजा मुंडे या भेटीनंतर बोलताना म्हणाल्या की, आज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागे देखील धनंजय मुंडे अॅडमिट होते. तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे, असं त्या म्हणाल्या.



