मुंबई, 12 जानेवारी: स्वमालकीची कार असावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आजकाल मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या खास फीचर्स असलेल्या कार उपलब्ध आहेत. यात एक्सयूव्ही कारकडे बहुतांश लोकांचा कल पाहायला मिळतो. सध्या एसयूव्ही कार एका ग्राहकामुळे जोरदार चर्चेत आहे. एका व्यक्तीनं महिंद्रा एक्सयूव्ही 300 ही कार खरेदी केली. पण कारमध्ये काही समस्या असल्याने ही व्यक्ती त्रस्त झाली आणि त्याने या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी या कारचा वापर कचरा गोळा करण्यासाठी सुरू केला आहे. हा सर्व प्रकार काय आहे ते जाणून घेऊया.
वृत्तानुसार, ही घटना पंजाबमधील आहे. एका ग्राहकाने त्याच्या घराजवळ असलेल्या महिंद्रा कंपनीच्या डीलरकडून नवी कोरी एक्सयूव्ही 300 कार खरेदी केली. महिंद्राने नुकतीच एक्सयूव्ही 300 ही कार नवीन लोगोसह मार्केटमध्ये लाँच केली आहे. कार खरेदी केल्यानंतर हा कार मालक कुटुंबासह फिरायला गेला. मात्र, त्याला कारमध्ये समस्या जाणवू लागल्या. कारचा परफॉरमन्स चांगला नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. काही दिवसांतच कार बंद पडली. प्रयत्न करूनही कार स्टार्ट होत नसल्याने ही व्यक्ती वैतागली. तो कार घेऊन डीलरकडे गेला. मात्र त्यानंतर त्याने कारचं रुपांतर कचरा जमा करणाऱ्या गाडीत केलं.
भारतात सामान्य लोकांसाठी कार खरेदी करणं ही खूप मोठी गोष्ट मानली जाते. कार नवीन असो अथवा सेकंडहँड तिचा दीर्घकाळ वापर करण्याकडे लोकांचा कल असतो. पण तुम्ही एक्सयूव्ही कारचा वापर कचरा गोळा करण्यासाठी केला जात असल्याचं पाहिलं आहे का? सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने मोठ्या उत्साहात महिंद्रा एक्सयूव्ही 300 ही कार खरेदी केली. पण आता ही व्यक्ती या कारचा वापर कचरा गोळा करण्यासाठी करत आहे.
कारमध्ये वारंवार समस्या निर्माण होत असल्याने या व्यक्तीने त्रस्त होऊन हे पाऊल उचललं आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. खराब कार दिल्याने कार मालकांना अनेक समस्या भेडसावत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. खरंतर कारमध्ये काही समस्या किंवा त्रुटी असतील तर संबंधित कंपनीकडून त्या दूर केल्या जातात. प्रसंगी कार बदलूनदेखील दिली जाते. वृत्तानुसार, एका व्हिडिओत एक नाराज असलेला कार मालक महिंद्रा एक्सयूव्ही 300 चा वापर चक्क कचरा गोळा करण्यासाठी करत असल्याचं दिसत आहे.



