पुणे : पुण्यातील जुना बाजार झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पुण्यातील मंगळवार पेठ, जुना बाजार येथे दुकानांना मोठी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. बुधावारी सकाळी ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.




