नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार गुरुवारी सोन्याचा दर ५२ रुपयांनी कमी होऊन ५६,४७५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर ८५० रुपयांनी कमी होऊन ६८,५०० रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन १,९०१ व चांदीचा दर २४.२३ डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, जपानच्या रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कसलीही वाढ केली नाही. त्यामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत आणि आगामी काळातही या परिस्थितीत कसलाही बदल होणार नाही, असे समजले जाते.
सोने – ५६,४७५ ₹
चांदी – ६८,५००₹
सेन्सेक्स – ६०,८५८
निफ्टी – १८, १०७
रुपया – ८१.३७ रु./ डॉलर
क्रूड – ८४.१८ डॉलर




