![]()
पुणे : दिवंगत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याचे चिन्ह आहेत. नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत कसबा पोटनिवडणूक शिवसेनेने लढावी, असा एकमुखी सुरू उमटला.
शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली काल (२९ जानेवारी ) पुण्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे यांनी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे. हा निरोप घेऊन संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.


