सहापदरीकरण (Six-laning work) अंतर्गत कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल (flyover) पाडण्यासाठीच्या तयारी, सूरक्षा व्यवस्था पूर्ण होत आली आहे.पूढील आठवड्यात हा पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे.
मात्र यामुळे महामार्गावरील येणारी-जाणारी वाहतूक कराड जवळ ठीक ठिकाणी वळवण्यात (Diversion) आली आहे. पूल पाडण्यासंदर्भातील अधिकृत सूचना जिल्हा प्रशासन कंपनीसोबतच्या चर्चेनंतर येत्या चार दिवसात जाहीर करणार आहे.
उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू झाल्यानंतर सातारा बाजू कडून कोल्हापूर कडे जाणारी सर्व वाहने कराडच्या पंकज हॉटेल समोर केलेल्या वळण (Diversion) मार्गातून महामार्गावरील लेन वरून जातील. पूढे कोयना खरेदी-विक्री खत कारखान्यासमोर केलेल्या वळण (Diversion) मार्गातून वाहने पुढे अक्षता कार्यालयासमोरुन मलकापूर पूलानजीक डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने पुढे जाणार आहेत. सध्या या ठिकाणी मलकापूर पूलाचे काम सूरू झालेले नाही मात्र ते ही दोन दिवसात सूरू होणार आहे.काम सूरू झाल्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे.
कोल्हापूर बाजू कडून साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहने मलकापूर कोयना औद्यो.मलकापूर पासून सर्व्हिस रोडवरुन ढेबेवाडी फाटा, नटराज टाॅकी अशी सर्व्हिस रोडने पुढे जातील. मात्र यातील काही वाहनांना कराडात प्रवेश करायचा झाल्यास पाटण तिकाटणे येथिल उड्डाणपूला खालून वळून यावे लागणार आहे.यामध्ये हलकी वाहने कोयना पुलावरून शहरात जातील तर जड वाहनांना पुलाखालून पंकज हॉटेल मार्गे सर्व्हिस रोडने कराड शहरात जाता येईल.
कराड शहरातून सातारा बाजूकडे जाणारी हलकी वाहने कोयना जुना पुलाचा वापर करतील शिवाय (कारखाना-शिरवडे-तासवडे व मसूर मार्गे) या मार्गावरुन ही जाऊ शकतात. तर जड वाहने कोल्हापूर नाक्यावरून डाव्या बाजूने सर्विस रस्त्याने महामार्गावर खरेदी विक्री पंपा समोर केलेल्या वळण (Diversion) मधून सातारा बाजूकडे वळतील यासाठी महामार्गावर पंपासमोर वळण (Diversion) मार्ग करण्यात आला आहे.
कोल्हापूर बाजू कडून व कराड तालुक्यातील ग्रामीण भागातून कराड शहरात प्रवेश करणारी वाहने ही डाव्या सर्विस रस्त्याने पाटण तिकाटणे येथिल पुलाखालून वळून शहरात जातील.यामध्ये हलकी वाहने कोयना पुलावरून तर जड वाहने पूलाखालून पंकज हॉटेल मार्गे सर्व्हिस रस्त्याने जातील.



