पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपला सगळ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. कसबा पोटनिवडणुक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केला आहे. मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
त्यातच आता भाजपचे खासदार दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांनी तळ ठोकलं आहे, सोबतच स्टार प्रचाराकांची फौज मैदानात तयार ठेवली आहे.मात्र आता भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कसबा मतदारसंघातील पाच वेळा आमदार राहिलेले, खासदार गिरीश बापट या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
अशी माहिती बापट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. मागील काही अनेक दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नाही.त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे बापटांनी प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.




