पुणे : पुण्यातील चिंचवड- कसब्याचा पोटनिवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासणे यांच्यात मताधिक्यावरून चढाओढ लागली आहे तर दुसरीकडे अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच, हिंदू महासभा अध्यक्ष आनंद दवे यादेखील उमेदवारी अर्ज दाखर केला होता. तर या दोघांच्या मतमोजणीची आकडेवारी पाहात दवे आणि बिचुकले मतांच्या शर्यतीत नोटा पुढे दिसत आहे.
कसब्यात अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत. मतमोजणीपूर्वी, अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणूक रद्द करावी, अशी अजब मागणी केली होती. बिचुकले यांनी. कसब्याचा तिसरा उमेदवार म्हणून मी कसब्याच्या दोन उमेदवारांवर कारवाई करण्याचं पत्र देत असल्याचं ते म्हणाले. ही निवडणूक प्रक्रिया रद्द करा आणि नव्यानं घ्या अशी मागणी पत्राद्वारे केली.
दुसऱ्या फेरीमध्ये मविआचे रवींद्र धंगेकर कसब्यातून आघाडीवर आहेत. धंगेकरांना ५ हजार तर भाजपाच्या हेमंत रासनेंना २८०० मतं मिळाली आहेत.खरी लढत रासने आणि धंगेकर यांच्यातकसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून दिल्या गेलेल्या उमेदवारीवरून मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात किंगमेकर कोण ठरतं याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर महाविकासआघाडीकडून रविंद्र धंगेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.




