पुणे, दि. 2 – पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी येत्या 2 एप्रिल रोजी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील केंद्रावर घेण्यात येणार आहे. या सीईटीसाठी 2 मार्च ते 11 मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
राज्य सीईटी सेलतर्फे विधी अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटीची प्रक्रिया राबविली जाते. ही सीईटी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येत आहे. या सीईटीसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सीईटीचे वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीईटी दिल्याशिवाय कोणत्याही विधी महाविद्यालयात प्रवेश घेता येत नाही.
त्यामुळे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. सीईटीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालयात प्रवेशाची निवड केली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले.




