मंचर: अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजी पाला, पाणी पुरी, ओली भेळ, आईस्क्रीम, वडापाव असे विविध पदार्थांचे स्टॉल लाऊन त्याची विक्री केली ग्रामस्थांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला एकूण १५० स्टॉलच्या माध्यमातून एकूण ५० हजार रुपयांची उलाढाल झाली.
बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर एलभर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश हिंगे, उपाध्यक्षा गीतांजली हिंगे, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य अंकुश शिंगाडे व सर्व सदस्य उपस्थित होते.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजी पाला, पाणी पुरी,ओली भेळ, आईस्क्रीम, वडा पाव , सामोसे, मिसळ, लस्सी, ताक, इडली, मोमोज, मेंदु वडा, गुलाबजामू, चायनीज पदार्थ,लाडूचे विविध प्रकार असे विविध पदार्थ विक्रीसाठी आणले होते मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉल वर जात खरेदी केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान काय असते, नफा तोटा तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता आहे की नाही याची जाणीव यातून झाली.




