पुणे : शिवसेनचे नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे काही फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडिया शेअर केले. यामध्ये सुप्रिया यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवतारे यांनी केला.
शिवतारे यांच्या या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्यावर टीका झाली. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
या सगळ्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे मागच्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्या आहेत. त्या मांसाहाराचं सेवन करत नाहीत, असं सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.




