नवी दिल्ली येथील सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग लागण्याची घटना समोर येत आहे. दिल्लीतील कापशेरा भागात सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी आहेत. ही आग सोनिया गांधी कॅम्पच्या एका गोडाऊनमध्ये लागल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#WATCH | Fire breaks out at a godown in Sonia Gandhi camp in Samalkha Kapashera area. 14 fire tenders have reached the spot, no casualties reported so far. pic.twitter.com/iMzbgoWxAG
— ANI (@ANI) April 6, 2023
दिल्लीच्या अग्निशमन विभागाचे विभागीय अधिकारी सतपाल भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागलेले गोडाऊन हे लाकडाचे आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 16 अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.




