नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी होणार आहेत का? पुन्हा काही राजकीय भूकप होणार आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारण महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत.
Maharashtra Governor Ramesh Bais called on the Hon'ble Prime Minister of India @narendramodi in New Delhi today. This was the first meeting of the Governor with the Prime Minister since assuming the charge of the post of Governor. pic.twitter.com/EIIvyAhIlb
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 10, 2023
राज्यपालांच्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. राज्यपालांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं असलं, तरीही या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पूर्ण झाली आहे, याचा निकाल आता कधीही लागू शकतो. त्यातच विरोधकांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असा अंदाज वर्तवला आहे.



