
बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि 11 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आता गाड्या बाजूला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे..



