पुणे: घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्यास हटकल्याने टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आली. मुंढवा भगातील केशवनगर येथे घडली.
रवींद्र दिगंबर गायकवाड ( रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई – म्हशींचा गोठा आहे. गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करत बसले होते.
त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना नशा करता का? अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. काही वेळाने टोळके कोयते घेऊन आले.त्यांनी पुन्हा गायकवाड यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी दहशत माजवून पसार झाले.




