![]()
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये समर्थकांनी राडा केला आहे. समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आक्रमक समर्थकांनी लाहोरमधील लष्करी कमांडरच्या निवासस्थानात आणि रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयात प्रवेश केला आहे, पाकिस्तानमधील माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
इम्रानचे समर्थकही लष्कराच्या मुख्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी कॅम्पसमध्ये घुसण्यापूर्वी दगडफेक देखील केली आहे. लोकांनी या ठिकाणी बॅरिकेड्सही तोडले आहे. ष्कराच्या मुख्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे.
मागील वर्षी एप्रिलमध्ये अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यानंतर खान यांना शंभरहून अधिक गुन्ह्यांशी जोडले गेले आहे. रशिया, चीन आणि अफगाणिस्तान बाबतच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांमुळे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कट रचला गेला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे. लाहोरच्या कॅन्टोन्मेंट भागात एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरी पीटीआय समर्थक घुसल्याचे वृत्त आहे.




