
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखाली पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी त्यांनी तोडफोड, जाळपोळ सुरु केली आहे. पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयावरही त्यांनी हल्ला केला आहे. या सर्व घडामोडींवर भारताचं सैन्य दलं बारकाईनं नजर ठेवून आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरही गस्त वाढवण्यात आली आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण दलांकडून पाकिस्तानातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. याचपार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवरील दक्षता आणि गस्त वाढवण्यात आली आहे, संरक्षण दलातील सुत्रांच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली.



