मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या (गुरुवार) जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी माहिती दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या निकालासाठी अवघे २४ तास उरले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“या देशात लोकशाही आहे की नाही? हा देश विधानसभा आणि संसद संविधानानुसार चालल्या आहेत की नाही, काम करताहेत की नाही, सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कोणाच्या दबावाखाली काम करतंय, याचाही फैसला उद्या लागेल असं संजय राऊत म्हणाले.



